रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. यासाठी आठवले यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. सरकारनं १९४९ चा महाबोधी मंदिर कायदा रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीसाठी बौद्ध भिक्खूंच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला नितीश कुमार यांनी भेट द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. नितीश कुमार यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन दिले असल्याचं आठवले यांनी वार्ताहरांना सांगितलं.
Site Admin | March 30, 2025 10:52 AM | Minister Ramdas Athawale
महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची रामदास आठवले यांची मागणी
