लष्कर दिन हा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस, डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांचे आहेत, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ७७व्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं, त्यावेळी गौरवगाथा या कार्यक्रमात ते बोलत होते.
तत्पूर्वी, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. लष्कर, पोलीस दल आणि महाराष्ट्र छात्रसेनेच्या महिला पथकाचा संचलनात सहभाग होता. प्रथमच नेपाळचा लष्करी वाद्यवृंदही या कार्यक्रमात सहभागी झाला होता.