पुढील महिन्यात बेंगळुरू इथे होणाऱ्या ‘एरो इंडिया 2025’ या आशियातील सर्वात भव्य हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत, राजदूतांच्या गोलमेज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला, भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या 150 हून अधिक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होण्याची अपेक्षा आहे, असं संरक्षण मंत्रालयाने म्हंटलं आहे. 10 ते 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या हवाई प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना ‘लक्षावधी संधींसाठीचा राजमार्ग’ अर्थात ‘रनवे टू बिलियन अपॉर्च्युनिटीज’ अशी आहे. या हवाई प्रदर्शनाच्या माध्यमातून, स्वदेशीकरणाला गती मिळेल तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या भागीदारीसाठी परदेशी आणि भारतीय कंपन्यांना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
Site Admin | January 10, 2025 11:05 AM | Minister Rajnath Singh
‘एरो इंडिया २०२५’ हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
