एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा तातडीनं लावाव्यात, सर्व बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. पुण्यातल्या स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड झाल्यानंतर राज्यातील सर्व बस डेपोंमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
Site Admin | February 27, 2025 9:09 PM | Minister Pratap Sarnaik
एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये CCTV लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश
