सेंद्रिय शेती हे अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या ८ व्या भागाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. सध्या देशाच्या सेंद्रिय उत्पादनांची निर्यात सहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोचली असून येत्या तीन वर्षांमध्ये हा आकडा २० हजार कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | January 9, 2025 8:12 PM | Minister Piyush Goyal | Organic Production.