डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी – मंत्री पीयूष गोयल

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. नवी दिल्ली इथे भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाला ते संबोधित करत होते. साल २००० ते २०२४ या काळात जपानमधून थेट परकीय गुंतवणूक ४३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. जपान हा भारताच्या परदेशी गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत असल्याचंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. सध्या १ हजार ४०० हून अधिक जपानी कंपन्या भारतात कार्यरत आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, तसंच दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरातल्या मेट्रो सेवांसारखे प्रकल्प भारताच्या विकासात जपानचा सक्रिय सहभाग दर्शवतात, असंही गोयल यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा