शेजारी राष्ट्रांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर भारतानं नेहमीच मदतीचा हात सर्वप्रथम पुढे केला आहे,असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित वर्ल्ड काँग्रेस ऑन डिझायस्टर मॅनॅजमेण्ट या परिषदेत ते बोलत होते. बचाव आणि मदत कार्यामध्ये सशस्त्र सेनेचं योगदान या विषयावर बोलताना त्यांनी पायदळ, नौदल, हवाईदल तसंच केंद्रीय आणि राज्य शीघ्र कृती दलानं केलेल्या त्यागाचं कौतुक केलं. कोविड काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून १०० हुन अधिक देशांना दिलेल्या मोफत लसीचा त्यांनी उल्लेख केला आणि भारतीय हवामान विभागाच्या कार्याचीही दखल घेतली.
Site Admin | January 15, 2025 8:43 PM | Minister Piyush Goyal