खेळणी तयार करण्यासाठी सर्व प्रकारचे घटक उपलब्ध करून देणारी परिसंस्था भारताने तयार केली असून भारत हा आता खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं पहिल्या इंडियन फाऊंडेशन क्वालिटी मॅनेजमेंट परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘विकसित भारत २०४७ साठी राष्ट्रीय गुणवत्ता चळवळीचं शासन’ या विषयावर गोयल बोलत होते. देशात एक मजबूत गुणवत्तापूर्ण परिसंस्था तयार करण्यासाठी सरकार झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट या सूत्रानुसार काम करत आहे, असं गोयल यावेळी म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी गुणवत्तापूर्ण परिसंस्था निर्माण करण्यासाठी उद्योगांनी सरकारसोबत भागीदारी करावी असं आवाहन गोयल यांनी केलं.
Site Admin | October 16, 2024 3:38 PM | India | Union Minister Piyush Goyal