११ व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भेटीदरम्यान गोयल ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ यांच्याशी चर्चा करतील. उभय देशांचे मंत्री व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा करतील. या भेटीमुळे ओमानसमवेत व्यापार आणि गुंतवणूक संबंधांबद्दल देशाची वचनबद्घता अधोरेखित होणार असून उभय देशांतील संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | January 27, 2025 1:21 PM | Minister Piyush Goyal
मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर
