अकोल्याच्या कापूस शेतीचं प्रारूप संपूर्ण विदर्भात राबवण्याचा मानस केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केला आहे. सध्या अकोल्यात साडेतीन हजार हेक्टरवर मोठ्या प्रमाणावर रोपण करून प्रति हेक्टर पंधराशे ते अठराशे किलो कापसाचं उत्पादन घेतलं जात आहे. पुढच्या वर्षी हे उत्पादन अकोल्यात 50 हजार हेक्टर वर घेण्याचं नियोजन आहे. नागपूरच्या दौऱ्यात त्यांनी वर्धा रोड इथल्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत बियाणे कंपन्या, शास्त्रज्ञ, जिनिंग कंपनीचे मालक, तसं इतर संबंधितांची बैठक घेतली.
देशात कापसांचं उत्पादन पुढच्या वर्षी किमान एक हजार किलो प्रति हेक्टरपर्यंत वाढावं यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
कृषि क्षेत्रानंतर रोजगार देणारं मोठे क्षेत्र वस्त्रोद्योग आहे. 2030 पर्यंत या क्षेत्रात 6 कोटी लोकांना रोजगार देऊ, असं ते म्हणाले.