देशात गेल्या १० वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. २००४ ते १४ या कालावधीच्या तुलनेत २०१४ ते २४ या काळात नक्षलवादी घटनांचं प्रमाण ५३ टक्क्यांनी कमी झालं आहे, असं ते म्हणाले. देशात नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन ३८ वर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या १० वर्षात नक्षलवादी घटनांमध्ये मृत पावलेले सुरक्षा दलाचे जवान तसंच नागरिकाचं प्रमाण देखील कमी झालं आहे, असं ते म्हणाले.
Site Admin | August 6, 2024 2:58 PM | Loksabha
देशात गेल्या १० वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरला – गृह राज्यमंत्री नित्यानंद राय
