महाराष्ट्रात वाढवण आणि ग्रेट निकोबार बेटावर गालाथी खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत असल्याचं केंद्रीय बंदरविकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं. नवीन सरकारचा १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त ते वार्ताहरांशी बोलत होते. या बंदरांच्या निर्मितीनंतर देशात मोठ्या बंदरांची संख्या १४ होणार असल्याचं सांगून ते म्हणाले की देशातल्या बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या ५ वर्षात २कोटी TEU पासून ४ कोटी TEU पर्यंत वाढेल.
Site Admin | September 25, 2024 3:41 PM | Sarbananda Sonowal