इटली इथे भरलेल्या जी सेव्हन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल सहभाग घेतला होता. हिंद-प्रशांत प्रदेशात नवीन भागीदारी, प्रश्न आणि संघर्ष या प्रमुख घटकांसह अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, असं जयशंकर या बैठकीत म्हणाले. या विषयाच्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांच्या प्रगतीचाही जयशंकर यांनी या बैठकीत उल्लेख केला. सागरी सुरक्षा, सेमी कंडक्टर्स, पुरवठा साखळी आणि कर्ज व्यवहार यांविषयीही जयशंकर यांनी या बैठकीत चर्चा केली.
Site Admin | November 27, 2024 1:08 PM | Minister Dr. S. Jaishankar
हिंद-प्रशांत प्रदेशात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर
