परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दोन दिवसांच्या स्पेन दौऱ्यात स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सँचेज यांची भेट घेतली. दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. यावेळी जयशंकर यांनी सँचेज यांना माद्रीद इथं झालेल्या चर्चेची माहिती दिली, तसंच दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधाच्या प्रगतीबद्दल सांगितलं.