शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरुपी राहतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत वनामती इथं आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी रस्ते अपघातातील वाढत्या मृत्यूंविषयी चिंता व्यक्त केली. रस्ते अपघात रोखायचे असतील तर अचूक निर्माणकार्य आणि समाजजागृती या दोन्ही गोष्टी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 11, 2025 8:17 PM | Minister Nitin Gadkari