महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात मानेवाडा इथं गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते. सहकार क्षेत्रातल्या संस्थांसाठी विश्वासार्हता आणि गुणवत्ता हेच सर्वांत मोठं भांडवल आहे, असं ते म्हणाले.
विदर्भात सहकार क्षेत्रात कर्मचारी आणि संचालकांना उत्तम प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. निर्णयक्षमता, सांघिक कार्य, यांचं प्रशिक्षण दिलं, तर त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.