रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी तडजोड न करता अंमलबजावणी केली तरच रस्ता अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होईल असं, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान २०२५ च उद्घाटन करताना ते बोलत होते.
मुंबई गोवा महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्सची गरज असून, त्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना त्यांनी परिवहन कार्यालयाला केली. या वेळी विना अपघात एस टी बस चालक आणि रिक्षा व्यावसायिकांचे सत्कार करण्यात आले. तसेच वेगाची नशा हे पथनाट्य सादर करण्यात आलं