बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिक इथं दिलं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मिनी सरस आणि जिल्हास्तरीय स्वयंसहायता समुहांची उत्पादनं तसंच विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकमध्ये झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ड्रोन दिदी, लखपती दिदी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Site Admin | January 11, 2025 8:13 PM | Manikrao Kokate
बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करणार -माणिकराव कोकाटे
