शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी करायच्या कारवाईबाबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना वेगळी वागणूक देत असून याबाबतचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे.
Site Admin | January 4, 2025 3:40 PM | Minister Manikarao Kokate
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद नव्या कायद्यात करणार
