जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इथं महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र सुरू करण्यात येईल, असंही लोढा म्हणाले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.
कौशल्य विकास विभाग आणि उच्च तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणाऱ्या संस्थांबाबत सर्वसमावेशक कायदा करणार असून व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालया अंतर्गत पाचशे विविध अभ्यासक्रमांचे व्हिडिओ ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचंही लोढा यांनी सांगितलं. आयटीआयची दर्जावाढ करण्यात येईल, एक लाख दहा हजार युवांना प्रशिक्षण देण्यात येईल, शंभर रोजगार मेळावे आयोजित केले जातील असंही लोढा यांनी सांगितलं.