भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर देश बनवण्याच्या प्रक्रियेत अल्पसंख्याक समुदायाचं योगदान महत्त्वाचं असणार आहे असं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत झालेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगांच्या परिषदेत बोलत होते.
अल्पसंख्याक समुदायात शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. केंद्र सरकार मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी या सहा अधिसूचित समुदायांच्या कल्याणासाठी अनेक समर्पित योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.