आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. महाराष्ट्रातल्या बौद्ध विहारांचा विकास करण्यात येईल असंही रिजिजू म्हणाले.
Site Admin | October 7, 2024 7:39 PM | Minister Kiren Rijiju
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा
