भारतीय संविधानाला येत्या २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. संविधानात बदल करण्यात येणार असा अपप्रचार काही घटकांकडून होत आहे, या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन रिजीजू यांनी केलं.
Site Admin | October 13, 2024 7:19 PM | Chhatrapati Sambhajinagar | Minister Kiran Rijiju