देशातल्या विमान तिकीटांच्या किमती तपासण्यासाठी केंद्राने राज्यांना विमान टर्बाईन इंधनावरचा कर कमी करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विमान तिकिटांच्या किमतीसंदर्भातल्या पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले की, विमानाच्या तिकीटाच्या किमतीचा ४५ टक्के भाग हा या कराचा असतो. काही राज्यं या इंधनावर २९ टक्के कर आकारत आहेत तर काहींनी तो पाच टक्क्याहून कमी केला आहे, अशी महिती नायडू यांनी लोकसभेत दिली. विमानाच्या तिकिटाचा दर हा मागणीवर आधारित असून तो दर सरकार निश्चित करत नसल्याचंही नायडू यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Site Admin | March 27, 2025 8:06 PM | Minister K Rammohan Naidu
विमान टर्बाईन इंधनावरचा कर कमी करण्यासाठी केंद्राचं राज्यांना पत्र
