येत्या तीन वर्षांत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येतील, अशी माहिती आज राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुढच्या आर्थिक वर्षात दोनशे डे केअर कॅन्सर सेंटर उघडली जातील, असंही नड्डा म्हणाले.
देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत जिथं निर्देश आणि नियमांचं उल्लंघन होईल, तिथं पथकं पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल, असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.