देशाला दुबळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आज केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. काँग्रेसनं सत्तालालसेपोटी देशाच्या एकात्मतेशी तडजोड केली आणि लोकांचा विश्वासघात केला असंही नड्डा म्हणाले. भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर कडक टीका केली.
Site Admin | January 15, 2025 8:33 PM | Minister JP Nadda
देशाला दुबळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा इतिहास – मंत्री जगतप्रकाश नड्डा
