डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची – मंत्री जयकुमार रावल

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज पुण्यात केलं. ते आज पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

 

राज्याच्या विविध भागातून भरडधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. हा महोत्सव १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा