डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण बदल – केंद्रीय आरोग्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली भारतीय आरोग्य सेवा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. हरियाणातील झज्जर इथे राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दुसऱ्या ऑन्कोलॉजी कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन समारंभाला काल संबोधित करताना ते बोलत होते. राष्ट्रीय कर्करोग संस्थेसारख्या संस्थांमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपण शक्य आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये २६ कोटींहून अधिक लोकांची तोंडाच्या कर्करोगासाठी, १४ कोटींहून अधिक लोकांची स्तनाच्या कर्करोगासाठी आणि ९ कोटींहून अधिक लोकांची गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे असं नड्डा यांनी सांगितलं .

सर्वाधिक वाचले

सर्व पहा