भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय भक्कम करण्याचा या बैठकीचा उद्देश होता.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जनता दल (संयुक्त) नेते आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह, जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, अपना दल पक्षाच्या अध्यक्ष केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, तसंच केंद्रीय एमएसएमई मंत्री जीतन राम मांझी या बैठकीला उपस्थित होते. तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू,शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनीही या बैठकीला हजेरी लावली.
Site Admin | December 26, 2024 12:47 PM | Minister J. P. Nadda | NDA