समाजातल्या सर्वांना सरकारकडून आरोग्य सुविधा मिळाव्यात यावर सरकारचा भर आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आज म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या समितीच्या ७७ व्या सत्राला त्यांनी संबोधित केलं. या सत्राच्या अध्यक्षपदी आज त्यांची निवड झाली. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा लाभ १२ कोटी कुटुंबांना मिळाला असून प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेसाठी जागतिक आरोग्य संघटनेला भारतानं पाठिंबा दिला आहे असं ते म्हणाले.
Site Admin | October 7, 2024 8:07 PM | Minister J. P. Nadda