भारत ऊर्जा सप्ताह २०२५ हा जागतिक स्तरावरचा दुसरा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम असेल, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जवळपास १ लाख चौरस मीटरपेक्षा अधिक जागेत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल आणि त्यात विविध सत्रांचा समावेश असेल, असंही ते यावेळी म्हणाले. ‘भारताची अत्यंत यशस्वी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असेल.
पुढच्या महिन्यात ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात १०५ चर्चा सत्रं, ७० हजारहून अधिक प्रतिनिधी तसंच, ब्रिटन, रशिया, जपान, जर्मनी आणि नेदरलँड्स सारख्या देशांची पथकं सहभागी होतील. या कार्यक्रमात हायड्रोजन, अक्षय्य उर्जा, जैवइंधन आणि पेट्रोकेमिकल्स यांच्याविषयी चर्चा होतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.