डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 1, 2024 8:39 PM | Aditi S Tatkare

printer

लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या जमा झालेल्या रकमेतून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न इत्यादीसाठीचं शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सांगितलं. त्या आज मंत्रालयात या योजनेसंदर्भात आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या. बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात, अशा सूचना आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा