भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी काम करायला सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भटक्या आणि विमुक्त जमातींच्या कल्याणाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यांनी केंद्राशी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कागदपत्र नसणं, ही भटक्या आणि विमुक्त समाजाची प्रमुख समस्या असून, त्यामुळे ते केंद्रसरकारच्या योजनांपासून वंचित राहत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 2, 2025 8:09 PM | Minister Dr. Virendra Kumar
भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी काम करायला सरकार कटिबद्ध – मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार
