डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकन प्रशासन भारताच्या हिताला अनुकूल – मंत्री डॉ. एस जयशंकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासन बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत असून ते भारताच्या हिताला अनुकूल असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल अपेक्षित होता आणि तो अनेक प्रकारे भारताला अनुकूल आहे. परराष्ट्र मंत्री काल लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये ‘जगातील भारताचा उदय आणि भूमिका’ या विषयावरील चर्चासत्राला संबोधित करत होते.

 

परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर सध्या 6 दिवसांच्या यूके आणि आयर्लंड दौऱ्यावर आहेत. काश्मीरमधील समस्या सोडवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. जयशंकर यांनी – कलम 370 रद्द करणे हे पहिलं पाऊल होतं, तर काश्मीरमध्ये विकास, आर्थिक उलाढाल आणि सामाजिक न्याय पुनरस्थापित करणे हे दुसरं पाऊल; आणि; मोठ्या संख्येने मतदानासह निवडणुका घेणे हे तिसरं पाऊल होतं असं सांगितलं. बेकायदेशीर रीत्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा बळकावलेला भाग परत मिळण्याची भारत वाट पाहत असून त्यानंतर काश्मीर प्रश्न सुटेल, असं ते म्हणाले.चीनबद्दल बोलताना, ऑक्टोबर 2024 पासून तिबेटमधील कैलास पर्वत तीर्थयात्रा मार्ग सुरू करण्यासारख्या काही सकारात्मक हालचालींचा उल्लेख डॉ. जयशंकर यांनी यावेळी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा