भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग हा दोन्ही देशांमधल्या मैत्रीचं प्रतीक ठरेल, असं जयशंकर आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत. प्रबोवो हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते काल नवी दिल्लीत दाखल झाले. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली.
प्रबोवो हे आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर प्रबोवो यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.