समता परिषदेची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जातिनिहाय जनगणना केल्यावर ओबीसींची स्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे केंद्राकडून निधी मिळेल, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊन शेतकरी आंदोलनावर तोडगा काढावा अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. तसंच ओबीसी आंदोलकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं.
Site Admin | June 17, 2024 7:28 PM | Chhagan Bhujbal | PM Modi
जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्र्यांकडे करणार – मंत्री छगन भुजबळ
