शेतीसंबंधी वादावर तोडगा काढण्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतजमिनीचा ताबा, वहिवाटी, कुटुंबातले वाद अशा प्रकरणावर सलोखा योजनेच्या माध्यमातून तोडगा काढला जातो. आतापर्यंत १ हजार ७ प्रकरणांवर यशस्वी तोडगा निघाला आहे. तसंच वादविवादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ८ कोटी ९९ लाख रुपयांची मुद्रांक सवलत महसूल विभागानं दिली आहे. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती.
Site Admin | April 8, 2025 8:18 PM | Minister Chandrasekhar Bawankule
शेतीसंबंधी वादावर तोडग्यासाठी असलेल्या सलोखा योजनेला २०२७ पर्यंत मुदतवाढ
