जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध असून या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणत आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी म्हटलं आहे. दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत ते बोलत होते. देशानं अथक परिश्रम करून आपले जलस्रोत लक्षणीय रित्या मजबूत केले आहेत आणि शाश्वत जल व्यवस्थापनात एक जागतिक आधारभूत मापदंड स्थापन केला आहे, ग्रामीण भारतात शुद्ध पेय जल पोहोचवण्यात केंद्र सरकारनं मोठं यश मिळवलं आहे, असं ते म्हणाले.
Site Admin | January 24, 2025 8:55 PM | Minister C R Paatil | WEF 2025
जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध – मंत्री सी आर पाटील
![जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध – मंत्री सी आर पाटील](https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2025/01/Screenshot-2025-01-24-205535.png)