डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 22, 2024 10:58 AM | Swachhata Hi Seva 2024

printer

स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त मंत्री भूपेंद्र यादव मुंबईतील जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी

‘आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. परभणीतही जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, एक पेड माँ के नाम, एकल वापर प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वच्छतेची जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा