राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करण्याची गरज असून येत्या पाच वर्षात १० हजार सहकारी संस्था उभारण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे, असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. पाटील यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात सहकार चळवळीचा आढावा घेतला. सहकारी संस्थाना पतपुरवठा करणं आणि वसुली करणं या पलीकडे जाऊन त्यांना सहकारी तत्वावर वेगवेगळे उद्योग करण्याची परवानगी दिली जाईल, असं ते म्हणाले.
सहकारी चळवळ टिकवायची आणि वाढवायची असेल तर कायद्यात सुुसूत्रता आणून कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.