केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरतमधील किम इथं बुलेट ट्रेन ट्रॅक स्लॅब निर्मिती केंद्राला ते भेट देतील.
वडोदरा इथल्या प्लासेर इंडिया कारखान्यालाही मंत्री महोदय भेट देतील. त्यानंतर ते वडोदरा इथल्या गति शक्ती विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित राहणार असून समारंभात विविध शाखांतील एकूण 239 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.