मेक इन इंडिया योजनेंतर्गत केंद्र सरकार खासगी कंपन्यांच्या सहकार्याने रेल्वेगाड्यांच्या चाकांची निर्मिती करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूर इथे दोन कंपन्यांच्या चाक निर्मिती विभागांना भेट दिल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सध्या रेल्वेला ८० हजारांहून अधिक उच्च शक्तीच्या चाकांची गरज आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून या निर्मितीला सुरुवात होईल. या चाकांचा वापर देशांतर्गत रेल्वे गाड्यांसाठी केला जाईल तसंच इतर देशांमध्येही त्याची निर्यात केली जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.
Site Admin | January 10, 2025 1:25 PM | Minister Ashwini Vaishnav