डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेची अधिसूचना काढण्यात येईल-अश्विनी वैष्णव

इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेची अधिसूचना आज काढण्यात येईल असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अधिसूचना जाहीर झाल्यावर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वं तयार करण्यासाठी उद्योजकांशी चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच या योजने अंतर्गत अर्ज स्वीकारायला काही दिवसातच सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं.
 
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेकरता २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे ९१ हजारपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा