भारत येत्या काही वर्षांत स्वतःची एआय प्रणाली विकसित करेल, असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज वक्त केला. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वैष्णव म्हणाले की, भारताने विकसित केलेलं हे तंत्रज्ञान जगातल्या सर्वोत्तम एआय तंत्रज्ञानाशी स्पर्धा करू शकेल. यासाठी लवकरच प्रस्ताव मागवण्यात येणार असून या सर्व तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी संस्थाही स्थापन केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
Site Admin | January 30, 2025 8:24 PM | Minister Ashwini Vaishnav
येत्या काही महिन्यात देशाची स्वतःची एआय प्रणाली विकसित होईल- अश्विनी वैष्णव
