विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती जोपासावी असा सल्ला केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत आयोजित एक्झॅम वॉरिअर्स कला महोत्सवात आज त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. अभिनेता आणि खेळाडू स्वतःच्या कामाचा ध्यास घेत असल्यानं ते उत्कृष्ट कामगिरीचं दर्शन घडवतात, असं ते म्हणाले. या महोत्सवात विविध शाळांमधल्या ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
Site Admin | January 4, 2025 8:13 PM | Minister Ashwini Vaishnav