राज्याच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या आणि अश्लील भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत. भारतीय डिजिटल पार्टी या ओटीटी वाहिनीच्या निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमाविरोधात अनेक तक्रारी शेलार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयात आज झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश शेलार यांनी दिले आहेत.
Site Admin | February 14, 2025 7:35 PM | Minister Ashish Shelar
रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या कार्यक्रमांच्या चौकशीचे आदेश
