डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्य सरकार यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करणार

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदापासून प्रथमच राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे. तालीम, प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार असून यातून नवे कलाकार उदयाला येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंतिम फेरीतल्या विजेत्या तीन एकांकिकांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट बोलीभाषा एकांकिकेसाठी ५० हजार रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.  तसंच उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, अभिनय अशी बक्षीसंही दिली जाणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा