डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 13, 2024 8:02 PM | Anupriya Patel | TB

printer

देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

राष्ट्रीय धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणीमुळे देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. पुढच्या वर्षापर्यंत देशभरातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. भारतात २०१५मध्ये क्षयरुग्णांच प्रमाण दर एक लाखामागे २३७ इतकं होतं. हे प्रमाण २०२३मध्ये दर एक लाखामागे १९५ इतकं घटलं आहे. तसंच, २०१५मध्ये क्षयरोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दर एक लाखामागे २८ इतकी होती. ती घटून आता २२वर आल्याची माहितीही पटेल यांनी दिली. जास्त रुग्णसंख्या असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करून मोफत निदान आणि औषधांच्या तरतुदीमुळेच हे साध्य झाल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा