भारतातल्या वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये विस्ताराची अफाट क्षमता आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं त्या वार्षिक आरोग्य परिषदेला संबोधित करत होत्या. भारतात वैद्यकिय उपकरणांचा व्यवसाय अंदाजे चौदा दशलक्ष डॉलर्स मूल्याचा आहे आणि तो वर्ष २०३०पर्यंत ३० दशलक्ष डॉलर्सपर्यंत जाईल असं त्यांनी सांगितलं. वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्राच्या आशियाई बाजारपेठेत भारत चौथ्या स्थानावर आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
Site Admin | December 19, 2024 3:25 PM | Minister Anupriya Patel