डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये ८०० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधे सुमारे ८०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन केलं. सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या १११ कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतल्या ४२१ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. पोलिसांसाठीच्या सदनिकांचं तसंच ३ महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाची कोनशिला त्यांनी बसवली.

 

दरभंगा इथल्या मच्छिमार सहकारी संस्थेत मखाणा प्रक्रीया उद्योगाचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं. बिहार राज्य सहकारी बँकेच्या मायक्रो एटीएमचं वाटप त्यांनी बँक मित्रांना केलं. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. शहा यांची आज गोपालगंज इथं जाहीर सभा होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा